डाएट गरजेचे…

पुणे, २० जुलै २०२२: कोरोनाच्या काळात कित्येक जण आजारी पडले, तर कित्येक जणांचे मानसिक संतुलन बिघडलं. यावर सगळ्यात महत्वाचा डॉक्टरांनी सल्ला दिला तो म्हणजे योग्य आहार आणि डाएट.
वास्तविक डाएट हे बारीक होण्यासाठी केले जाते, हा गैरसमज समाजात प्रचलित आहे. यासाठी हा गैरसमज मनातून काढून टाकणे गरजेचे आहे आणि डाएटसाठी योग्य आहारतज्ञांकडून आहार घेणे आवश्यक आहे.
डाएट करताना काही मह्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

१. न्याहारी किंवा ब्रेकफास्ट टाळू नका. नेहमी लोक ब्रेकफास्ट टाळून थेट जेवण करतात. त्यामुळे पोटात गॅस्ट्रिक अँसिड तयार होऊन अँसिडीटी होण्याची शक्यता असते.

२. फळे आणि भाज्या यांचा आहारात योग्य वापर असावा. ज्यामुळे व्हिटॅमिनचे शरीरात योग्य प्रमाण राखले जाऊ शकते.

३. दोन जेवणात आठ तासाचे अंतर असावे.

४. दिवसाला कमीत कमी १६ ग्लास पाणी प्यावे.

५. रोज कमीत कमी २० मिनिटे व्यायाम करावा. दुपारी १२ च्या आत व्यायामाची योग्य वेळ असते. ज्यात शरीरातले स्नायू अँक्टीव्ह असतात.

६. जेवणात फायबर आणि प्रथिनांचा योग्य वापर करावा. यासाठी मांसाहार आवश्यक आहे.

७. सध्या बाजारात प्रोटीन पावडरचा सर्रास वापर सुरु आहे. मात्र याचे साईड इफेक्टस असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय कुठल्याही पावडरींचे सेवन करु नये.

८. घास नेहमी जेवताना ३२ वेळा चावावा, असं आपण कायम ऐकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक घास चावून खावा. ज्यामुळे पचायला तो जड होणार नाही

९. काही फळांमध्ये खूप साखर असते किवा काही फळे खाऊ नये, असे गैरसमज जास्त प्रचलित आहे. याउलट प्रत्येक मोसमातले फळ आवर्जुन खावे.

१०. कायम जेवण्यासाठी छोटी प्लेट घ्यावी. ज्यामुळे कमी प्रमाणात जेवण ताटात वाढले जाईल. तेवढेच खाल्ले जाईल.

११. मद्यसेवन, जंक फूड यांच्यावर कायम नियंत्रण असावे.

१२. तुमच्या जेवणाचे रोज नित्यनियमाने प्लॅनिंग करा. जेणेकरुन अन्न हे खरोखरच पूर्णब्रह्म असल्याचे तुम्हाला आणि तुमच्या शरीराला जाणवेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा