PCOD vs PCOS: Key Differences, Symptoms & Treatment Guide: PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) आणि PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) हे दोन आजार आहेत जे महिलांच्या हार्मोनल आरोग्यावर परिणाम करतात. बऱ्याचदा लोक यांना एकच समजतात, पण याचे कारण, लक्षणे आणि दीर्घकालीन परिणाम वेगळे आहेत.
चला, याबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊ.
PCOD म्हणजे काय?
PCOD मध्ये महिलांच्या ओव्हरीस अपरिपक्व किंवा अंशतः परिपक्व एगस तयार होतात, ज्यामुळे काहीवेळा गाठी (cyst) तयार होतात. यामुळे हार्मोनल असंतुलन होते, पण हा आजार साधारणपणे PCOS पेक्षा कमी गंभीर असतो.
Symptoms of PCOD;
अनियमित मासिक पाळी,वजन वाढणे,मुरुम आणि तेलकट त्वचा, केस गळणे आणि थकवा येणे.
उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला;
PCOD चा सामना करण्यासाठी निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यासारख्या साध्या बदलांनी बराच फायदा होऊ शकतो.
आता पाहुयात PCOS म्हणजे काय?
PCOS हा हार्मोनल आणि मेटेबोलिस्टिक संबंधित आजार आहे, जो केवळ ओव्हरीसवर नाही तर शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करतो. यामध्ये पुरुष हार्मोन्स (अँड्रोजन्स) चे प्रमाण वाढते, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Symptoms of PCOS;
खूप अनियमित मासिक पाळी येणे, चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त केस वाढणे, सतत मुरुम येणे, लठ्ठपणा किंवा वजन कमी करणे कठीण होणे वंध्यत्व, मधुमेह आणि हृदयरोगांचा धोका वाढणे.
उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला;
PCOD च्या तुलनेत PCOS साठी केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसे नसतात, यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज भासते.
PCOD आणि PCOS मध्ये काही लक्षणे समान असतात, जसे की अनियमित पाळी आणि मुरुम. पण PCOS ची लक्षणे जास्त गंभीर असतात आणि यामुळे दीर्घकालीन समस्या जसे की इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.
थोडक्यात सांगायचे तर, PCOD हा कमी गंभीर आजार आहे जो योग्य जीवनशैलीने नियंत्रित होऊ शकतो, तर PCOS मध्ये वैद्यकीय उपचार आणि काळजी घ्यावी लागते. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.
सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न:
PCOD असताना वजन कसे कमी करावे?
PCOD मुळे हार्मोनल असंतुलनामुळे वजन कमी करण थोड कठीण असत, पण योग्य पद्धतीने ते शक्य आहे.कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त फायबर असलेला आहार घावा, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यासोबतच नियमित व्यायाम करण, ज्यामध्ये कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश असावा. हे तुमचे मेटाबोलिसम वाढवते. शरीराच्या वजनापैकी फक्त 5-10% वजन कमी केल्याने PCOD ची लक्षणे आणि हार्मोनल संतुलन सुधारू शकते.
PCOS मुळे कर्करोगाचा धोका वाढतो का?
PCOS मुळे अनियमित मासिक पाळी आणि इस्ट्रोजेन हार्मोनच्या जास्त संपर्कामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका थोडा वाढतो पण नियमित तपासणी आणि निरोगी वजन राखल्यास हा धोका कमी होऊ शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे













































