डिजिटल इंडियाला झाले ६ वर्ष पूर्ण , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

दिल्ली १ जुलै २०२१ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला डिजिटल इंडीयाचे सहा वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि डिजिटल इंडीयामार्फत अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. त्यावेळी त्यांनी सांगितले की एकवीसाव्या शतकात डिडिटल इंडिया म्हणजे वेळ आणि पैशाची बचत होय. त्यामुळे आजच्या काळात डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे. या डिजिटल इंडियामार्फेत गावोगावी इंटरनेट आणि तंज्ञज्ञान पोहचवण्याचे काम सुरु आहे. ज्यायोगे देश पुढे जाईल. देशातल्या कानाकोप-यात सर्व गरीबांपर्यंत पोहोचण्याचे काम डिजिटल इंडियाने केले आहे.
लोकांना रेशन मिळण्यापासून ते आरोग्य सेतूमार्फत कोरोनाचे लसीकरण हा डिजिटल इंडियाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आता डिजिटल पेमेंटही काळाची गरज असल्याचं नमूद केलं. डिजिटल लॉकरद्वारे सर्व दस्तावेज सुरक्षित रहाण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच  याच डिजिटल इंडियाद्वारे कॉमन सर्विस सेंटरद्वारा तरुणांना रोजगार मिळाला. इंटरनेट सुविधाद्वारे पहाडी क्षेत्रातल्या लोकांना कोरोना काळात लाभ मिळाला. करोड मजदूर लोकांना वन नेशन-वन रेशन कार्डमुळे लाभ मिळाला. तसेच नारीशक्ती देशाची ताकद आहे. तीदेखील डिजिटल इंडियामुळे आत्मनिर्भर व्हायला हवी आणि होत आहे असे त्यांनी सांगितलं. कोरोनाकाळात टेलिमेडिसीनचा लाभ अनेक लोकांना मिळाला. सर्वसामान्यापासून ते गरीबापर्यंत सर्वजण आत्मनिर्भय होण्यासाठी डिजिटल इंडिया कायम उपयुक्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा