What is Digital Legacy: ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याची मालमत्ता, बँक खाती, संपत्ती या सगळ्या गोष्टींसाठी कायदेशीर वारस ठरलेला असतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडीया अकाऊंटचं काय होत ? त्याच्या अकाऊंटवरील पोस्ट,आठवणी आणि रील्सचं काय होत ? याच प्रश्नावर तोडगा काढत सोशल मीडीया कंपन्यांनी आता “डिजिटल वारस” ठरवण्याची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. पण डिजिटल लिगसी म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊया.
Digital Legacy म्हणजे काय ?

‘Digital Legacy’ म्हणजे असा एक पर्याय असतो, जिथे तुमच्या मृत्यूनंतर तुमचं सोशल मीडिया अकाऊंट कोण सांभाळणार किंवा त्याच्यावर कोणाचा अधिकार असणार हे तुम्हाला आधीच निश्चित करण्याची मुभा असते. Instagram, फेसबूक यासारखे प्लॅटफॉर्म तुम्हाला आशा प्रकारचे फीचर उपलब्ध करून देतात. यामुळे तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती, आठवणी आणि डेटावर संपूर्ण हक्क तुमच्या विश्वासातील व्यक्तीला देता येतो. यामुळे त्या व्यक्तीला तुमच्या निधनानंतर अकाऊंटच्या काही मर्यादित गोष्टी नियंत्रित करता येतात जसे की प्रोफाइल फोटो बदलणे, श्रद्धांजली पोस्ट टाकणे.इत्यादी. तर तुम्ही सुद्धा आणखीन तुमची डिजिटल लिगसी सेट केली नसेल तर आताच सेट करून घ्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर











































