‘डिजिटल युनिव्हर्सिटी, फ्री टीवी चॅनलवरून अभ्यास’, या आहेत शैक्षणिक बजेटच्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022: शैक्षणिक अर्थसंकल्प 2022 LIVE अपडेट: 01 फेब्रुवारी रोजी देशाचा 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, “कोरोनामुळं मुलांचं शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ‘1 वर्ग 1 टीव्ही चॅनल’ची संख्या 12 वरून 200 पर्यंत केली जाईल.

याशिवाय, शिक्षकांना डिजिटल साधनांनी सुसज्ज केलं जाईल जेणेकरून ते मुलांना प्रादेशिक भाषेत जागतिक दर्जाचं शिक्षण देऊ शकतील. प्रादेशिक भाषांमध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंत मोफत टीव्ही चॅनेलची संख्या 200 पर्यंत वाढवली जाईल.

करण्यात येणार डिजिटल विद्यापीठाची स्थापना

सध्याची परिस्थिती पाहता डिजिटल शिक्षणाला चालना दिली जाईल. त्यासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यापीठात वैयक्तिक भाषेत (स्थानिक भाषा) आयसीटी (इंफॉर्मेशन कम्‍यूनिकेशन टेक्‍नोलॉजी) फॉरमॅटवर शिक्षण दिलं जाईल.

लॉन्च होणार डिजिटल इकोसिस्टम

स्किल डेवलेपमेंट आणि उपजीविकेसाठी डिजिटल इकोसिस्टम सुरू केली जाईल. ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे नागरिकांना कौशल्य, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्रदान करणं हा त्याचा उद्देश असंल. नोकऱ्या आणि संधी शोधण्यासाठी API आधारित कौशल्य क्रेडेन्शियल आणि पेमेंट स्तर देखील असतील.

रिजल्‍ट ओरिएंटेड असणार यूनिवर्सिटी सिलेबस

ग्रामीण भागाच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. AICTE अर्बन प्‍लैनिंग कोर्सेज विकसित करेल आणि नॅचरल, झीरो-बजेट ऑर्गेनिक फार्मिंग आणि मॉर्डन डे एग्रिकल्‍चरसाठी अभ्यासक्रम बदलेल.

निर्माण होतील 60 लाख नवीन रोजगार

देशातील तरुणांसाठी घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. याशिवाय पुढील 5 वर्षांत 30 लाख अतिरिक्त नोकऱ्याही उपलब्ध होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा