डिजिटायझेशनचं ई-बजेट -संमिश्र बजेट

9

केंद्राचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. यावेळेसचं अर्थसंकल्प इतका डिजिटायझेशनवर भर दिला, की अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी हे आयपॅडवरुन वाचून दाखवला. हिच डिजिटायझेशनची सुरुवात म्हणावी लागेल.

या अर्थसंकल्पातून गरीबी हटाओ या संकल्पनेला वाव देण्यात आला आहे. गरीब व्यक्तीकडे घर, शौचालय, आणि उत्तम सुविधा असाव्यात , अशा उद्देशाने हे बजेट तयार करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर डिजीटल सुविधा देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश्य या बजेटची असल्याचे मानावे लागेल.

कृषी क्षेत्र
संकल्पात कृषी क्षेत्राला वाव देण्यात आला आहे. ज्यात शेतीविषय शिकवण्यासाठी महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहे. रसायनमुक्त शेतीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठीदेखील आता डिजिटायझेनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. शेतांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी ड्रोन योजना सुरु करण्यात येणार आहेत. भारतात तेलबियांचे उत्पादन आयात करावे लागते. या तेलबियांचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात भारतात करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. यासाठी झिरो बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करण्यात येणार असून सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येणार आहे. जेणेकरुन शेतकरी आत्मनिर्भर होईल, याकडे या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे.

चलन
भारतात सध्या क्रिप्टो करन्सीवर भर दिला जातो. या क्रिप्टो करन्सीवर ३० टक्के कर या संकल्पात लावण्यात आला आहे. यंदा रिझर्व्ह बॅंकेचे डिजिटल चलन अस्तित्वात आणणार असून त्यामुळे भारत डिजिटल करन्सीमध्ये मागे राहणार नाही.

मानसिक स्वास्थ्यता
कोरोना काळात जनतेचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ बिघडले आहे. यासाठी योग योजना करुन ट्रिपल IIT असलेली बेंगलोरची संस्था यासाठी मदत करणार आहे.

डिजिटायझेन
5G ही संकल्पना वास्तवात आणून भारताची डिजिटल इंडिया कडे वाटचाल करणार आहेत. ज्यामुळे अनेक नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतातल्या सर्व सरकारी कागदपत्रांचे डिजिटाझेशन होईल. खासगी आणि सरकारी बॅंकेच्या सर्व सुविधा पोस्टातही उपलब्ध होतील. त्यामुळे पोस्टाचे स्वरुप बदलेल.

ई-वाहन
प्रदूषण मुक्तीवर पर्याय म्हणून ई -बाईक्स आता बाजारात येत आहेत. मात्र त्यासाठी भेडसावणारा प्रश्न म्हणजे बॅटरीचे चार्जिंग. आता यावर बॅटरी स्वॅपिॅंग योजना सुरु करण्यात येणार असून बॅटरी बदलण्याची स्टेशन्स निर्माण करण्यात येणार आहे .

अपेक्षा भंग
या संकल्पातून करदात्यांची मात्र अपेक्षा पूर्ण झाली नाही. कर भरण्यामध्ये किंवा त्याच्या कालावधीत कोणतीही सवलत नाही. मात्र आयकर भरताना कोणतीही चूक झाली तर ती सुधारण्याची सवलत मात्र मिळालेला आहे.

काय स्वस्त ….
कपडे, लेदर वस्तू, हिरे, साबण, मोबाईल चार्जर, कॅमेऱ्याची लेन्स, शेतीची अवजारे

काय महागले ….
विदेशी छत्र्या , परदेशातून आयात केलेल्या वस्तू, पॅालिश केलेले हिरे, डिजिटल करन्सीवरील गुंतवणूक
आता हा अर्थसंकल्प कशा पद्धतीने जनतेच्या उपयोगी पडणार आहे, हे पाहणं खूप महत्वाचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस