मुंबई, ३ सप्टेंबर २०२०: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचे २१ ऑगस्ट २०२० रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. तसेच आज त्यांच्या निधनाला १२ दिवस ही उलटले नाहीत आणि दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
दिलीप कुमार यांच्या निधन झालेल्या भावाचं नाव एहसान खान असून त्यांना ही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे असलम खान आणि एहसान खान हे दोघे ही व्हेंटिलेटर वर होते. एहसान खान यांच्यावर हृदय रोग, हायपर टेन्शन आणि अल्झायमर यासारख्या आजारांवरही उपचार चालू होते.
एहसान खान यांनी ९० व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून असलम खान यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांचं २ सप्टेंबरला रात्री ११ वाजता निधन झालं. दिलीप कुमार यांची प्रकृती ठिक आहे, मात्र कुमार कुटुंबामध्ये दुःखाची लाट पसरली आहे. गेल्या १२ दिवसातं कुमार कुटुंबामध्ये कोरोना मुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे