कंटेन्मेंट झोन परिसरात फिरणाऱ्यांचे थेट विलगीकरण करा: तुकाराम मुंडे

नागपूर, दि. ९ मे २०२० : नागपूर शहरातील कंटेन्मेंट झोन परिसरात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना थेट विलगीकरण कक्षात दाखल करावे, कुणी जर पोलिसांसोबत हुज्जत घालत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत.

नागपूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी या सूचना केल्या आहेत.

पुढचे १५ दिवस नागपुरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनमधील कुठलीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही, असा बंदोबस्त करण्याचे आवाहन मुंढेंनी पोलिसांना केले आहे. तसेच नागरिकांनी देखील या कठिण प्रसंगी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवार ( दि.८ ) रोजी नागपुरात दिवसभरात आणखी दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा थेट २७० वर पोहोचला आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. आतापर्यंत ६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु लॉकडाऊन असतानाही काही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याचे उघडकीस आल्यामुळे नागपूर महापालिकेने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्याचे मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा