मुंबई, दि.२२ मे २०२०: सोशल मीडियावर आपल्या रोखठोक विधानामुळे नेहमी चर्चेत असणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यात अजून भर म्हणून त्याने कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी त्याने सरकारला मदत म्हणून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या ट्रॉफीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.
या लिलावातून मिळणारे पैसे तो टेस्ट किटसाठी देणार असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
देशासह राज्यात सध्या चौथा लॉकडाऊन सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकार देखील मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनुराग कश्यपला ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तो याच ट्रॉफीचा लिलाव करणार आहे. त्याच्या या निर्णयाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.
अनुरागचाच कित्ता आता कॉमेडियन कुणाल कामरा आणि वरुण ग्रोवर गिरवणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.हे देखील आपल्या ट्रॉफीचा लिलाव करणार असून त्यातून मिळणारी रक्कम सरकारला मदत म्हणून देण्यात येणार आहे.
याशिवाय कुणाल कामराने त्याच्या यूट्यूब बटणाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून. या कलाकारांना ३० दिवसांमध्ये १३ लाख ४४ हजार रुपये कोविड-१९ च्या टेस्ट किटच्या खरेदीसाठी जमा करायचे आहेत. आता बॉलिवूडमधून मदतीसाठी विविध कलाकार पुढे येत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: