पुणे, २२ ऑक्टोबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० ऑक्टोबर रोजी जनतेशी संवाद साधला. मात्र, यावेळी त्यांच्या या संशोधनात एक वेगळी गोष्ट निदर्शनास आली. ती म्हणजे याआधी रात्री आठ वाजता हे संबोधन केले जात असायचं. मात्र, यावेळी ते सहा वाजताच करण्यात आलं. मोदींच्या या भाषणाशी संबंधित आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या व्हिडिओला येणारे डिसलाइक. मागच्या वेळी देखील त्यांनी जनतेला संबोधित केलं होतं आणि हजारोंच्या संख्येने त्यांच्या व्हिडिओला डिसलाईक आले होते. यंदाही तेच चित्र बघण्यास मिळाला आहे.
यावेळी मोदींनी कोरोना बाबत अनेक सूचना व माहिती आपल्या भाषणातून दिली. देशामध्ये कोरोनाची सध्या काय परिस्थिती आहे, सरकारने तयारी कशी केली आहे, काय काळजी घ्यायला हवी, बाकी देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी कशी आहे अशा अनेक गोष्टींवर मोदींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. मोदींच्या या भाषणाचा व्हिडिओ तब्बल १३ मिनिटे ८ सेकंदांचा होता. जो भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला होता. मात्र, त्यांच्या भाषणादरम्यान हा व्हिडीओ युट्युब वर लाईव्ह चालू होता आणि त्यादरम्यानच अवघ्या काही वेळातच त्यांच्या या भाषणाला हजारोंचे डिसलाइक येण्यास सुरुवात झाली.
ट्यूबवर या व्हिडीओला लाईक्सपेक्षा डिस्लाइक्सची संख्या अधिक होती. दोन महिन्यांपूर्वी मोदींच्या मन की बातच्या व्हिडीओलाही डिस्लाईक करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने मंगळवारच्या भाषणासंदर्भात असं काही झाल्यास हे थांबवण्यासाठी आधीपासूनच तयारी करुन ठेवली होती. म्हणजेच मोदींच्या भाषणाचा हा व्हिडिओ यूट्यूब वर लाईव्ह प्रसारित होत असतानाच काही मिनिटांतच हजारोने डिसलाइक होण्यास सुरुवात झाली. हे लक्षात येताच भाजपने युट्युब वरील लाईक, डीस लाईक बटन डिसेबल करून टाकले.
मात्र, अनेकांनी या व्हिडीओला अवघ्या काही मिनिटांमध्ये साडेचार हजार डिस्लाइक असल्याचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. अशाप्रकारे भाजपाला लाइव्ह व्हिडीओदरम्यान लाइक डिस्लाइकचा पर्याय बंद करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुर्वीही प्रवेश परिक्षांच्या मुद्द्यांवरुन मोदींच्या मन की बातच्या व्हिडीओला तरुणांनी डिस्लाइल केल्याचे वृत्त समोर आलं होतं. द क्विंटने यासंदर्भात दिलेल्या एका वृत्तामध्ये मोदींच्या या व्हिडीओवरील १५ हजार डिस्लाइक काढून टाकण्यात आले होते. युट्यूब अल्गोरिदममध्ये अनपेक्षित ट्रेण्ड दिसून आल्यास अशापद्धतीने लाईक किंवा डिस्लाइकची संख्या वाढते असं सांगितलं जातं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे