पुरंदर, १४ ऑक्टोबर २०२०: पुणे व सातारा जिल्ह्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दोन दिवस सुरू असलेल्या संतधार पावसामुळे वीर धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाल्याने वीर धरणाच्या संद्व्यातून नीरा नदी पात्रात तीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाठबंधारे विभागाने नीरा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तसेच पुढे सोलापूर जिल्ह्याला वरदायनी असलेल्या नीरा नदीत आज सायंकाळी सात वाजल्यापासून वीर धरणातुन २३८८५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले.
भोर – वेल्हा तालुक्यातील नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भाटघर, नीरादेवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वीरसह सर्व धरणे १०० टक्के भरले असून आज सकाळी आठ वाजल्यापासून वीर धरणातून ४ हजार ६३७ क्युसेक्स वेगाने नीरा नदी पत्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली होती. तर दुपार नंतर १४ हजार ५११ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते तर सायंकाळी सात वाजले पासून २३८८५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे.