वाघोलीतील विकास कामाबाबत पीएमआरडी आयुक्तांशी चर्चा

वाघोली, दि. २५ जून २०२० : काल वार मंगळवार दि. २४ जून २०२० रोजी माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी वाघोली व परिसरातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली.

वाघोली आवळवाडी येथील रखडलेले नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेबाबत असलेल्या अडचणी सोडवून त्या योजनेचे काम आठवडे भरात सुरू करून मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करणे व वाघोली कचरा प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे सुमारे चार कोटी रुपये यासाठी खर्च असून लवकरच ते काम सुरू करणे, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी डीपी रस्त्याबाबत बोर्ड मिटिंगच्या मंजुरीनंतर ही कामे सुरू करणे, वाघोली मध्ये सुरू असलेल्या ड्रेनेज वाहिनीचे काम, ग्रामपंचायतीने सुचविलेले अमेनिटी स्पेस एसटी प्रकल्पासाठी देणे असे निर्णय चर्चेत झाले.

नुकतेच प्रॉब्लेम सॉलव्हर ग्रुप व नागरिकांनी पीएमआरडीए कार्यालयाबाहेर वाघोली येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे यासाठी आंदोलन केले होते. यानंतर आज आढळराव पाटील व कटके यांनी भेट घेतली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, पीएमआरडीए पाणीपुरवठा मुख्य अभियंता पालवे, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण सातव, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सातव, सागर गोरे, सुधीर दळवी, गणेश गोगावले, उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा