“दिशा” विधेयक मंजूर; आता बलात्काऱ्यांना मिळणार २१ दिवसात फाशी

23

नवी दिल्ली: आंध्र प्रदेश विधानसभेने शुक्रवारी (दि.१३) ‘दिशा विधेयक’ पारित केले आहे. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसात निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद यामध्ये आहे.
महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून मृतदेह जाळण्याची घटना काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये घडली होती. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने हे विधेयक पारित केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने हे ‘दिशा’ विधेयक मंजूर केले आहे.

काय आहे तरतूद…

◆ ‘दिशा’ विधेयकात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाल्यापासून २१ दिवसात सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे.
◆ विधेयकात भारतीय दंड विधानाच्या ३५४ कलमात दुरुस्ती करण्यात आली असून ३५४ (ई) हे कलम बनवण्यात आले आहे.
◆या प्रकारच्या प्रकरणात साक्षीपुरावे आहेत, तेथे तपास ७ दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे.
◆ १४ दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर २१ दिवसात शिक्षा देण्यात येण्याची तरतूद यामध्ये आहे.