मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांचा शाब्दिक वाद पुन्हा एकदा समोर

6

मुंबई, २ ऑगस्ट २०२०: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक वाद परत एकदा समोर आला आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर नेहमीच ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना बोलवू शकतात असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना प्रश्न कर्त्याने मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पुरेशा चाचण्या होत नाहीत तर महाराष्ट्रात करोना मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. करोनावर उपाय योजना करण्यात सकराला काहीसे अपयश आले आहे असे मंत मांडले आहे. त्याबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत आणि ते बडी आसामी आहेत. असे बोलत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे.

त्या आधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कोरोनाच्या काळात अनेक वेळा आघडी सरकावर निशाणे साधले आहेत. तर त्यांनी हे सरकार लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेलं सरकार आहे असे देखील बोलले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा