मुंबई, २१ जुलै २०२० : सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. सरकार सुद्धा कोरोनाला झुंज देत आहे. या वेळी सरकार आणि विरोधकांमध्ये अनेक वाद रंगले. तसाच आणखी एक वाद आता रंगला आहे आणि तो म्हणजे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावरून.
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून २०२० दरम्यान समाप्त झाली आहे. तर १२ हजार ६८८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधी दरम्यान समाप्त होणार आहे.
जागतिक कोरोना संकटामुळे या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.
परंतू आता कोरोनाच्या कामात अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचं सांगत या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णय ग्राम विकास खात्याने घेतला आहे. यावरून सरकार व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी