गरीब गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप

बारामती, २२ डिसेंबर २०२०: बारामती शहरातील स्व. विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठान व पलंगे पेट्रोलियम यांच्या वतीने दर वर्षी गरजू लोकांसाठी मदतीचे उपक्रम राबविले जातात. यंदा पलंगे कुटुंबीयांनी तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी गरजू नागरिकांना पाचशे ब्लॅंकेटचे वाटप केले आहे.

स्व. विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठानकडून दर वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात यंदाच्या वर्षी पडलेल्या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर असणाऱ्या गरीब लोकांना पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गानगापुर या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाचशे ब्लँकेटचे वाटप केले आहे.

पलंगे कुटुंबीय हे समाजातील अनेक दुबळ्या घटकांना मदत करत असतात. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात गरजु नागरिकांना अन्न धान्याचे किट वाटप केले होते. तसेच अनाथ आश्रमातील मुलांना देखील मदत करत असतात. यामध्ये गणेश पलंगे, शैलेश पलंगे, गितेश पलंगे, उमेश पलंगे, संजय किर्वे समाजोपयोगी कार्यात सहभागी असतात.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा