नागपूरमधील सीआरपीएफ रोजगार मेळाव्यात नियुक्ती पत्रांचे वाटप

नागपूर, १३ फेब्रुवारी २०२४ : सीआरपीएफ नागपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक आय लोकेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षेत विविध कार्यालयातील रिक्त पदे व नवीन पदे भरण्याच्या प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांसाठी ग्रुप सेंटर नागपूर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सन्मान प्रक्रियेद्वारे नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत सरकार पूर्ण निर्धाराने राबवत असलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकार वचनबद्ध आहे. या क्रमाने, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी रोजगार मेळाव्याचा १२ वा भाग आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे डिजिटल माध्यमातून केली होती. यानंतर, देशाच्या विविध भागांमध्ये एक लाखाहून अधिक यशस्वी उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये सीआरपीएफ, रेल्वे, पोस्ट विभाग, सीआयएफ, एम्स अशा देशातील विविध विभागांमधील निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी इन्स्पेक्टर मेडिकल डॉ. मनोज सिन्हा, डीजी पंढरीनाथ, श्रीमती श्याम होई चिंग मेहरा, आदींनी नियुक्ती पत्रही प्रदान केले. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय निर्मळ, राहूल भसारकर, जनसंपर्क अधिकारी प्रदीप द्विवेदी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा