नांदगाव येथे ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप

कर्जत, दि. ६ जून २०२०: कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे डाॅ. प्रविण जगताप यांच्या कडून ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप आणि ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. समाजसेवा ही कोणत्याही निमित्ताने करता येते. याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल.

सविस्तर वृत्त असे की डाॅ. प्रविण जगताप यांच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जगताप यांनी गावातील नागरिकांना गोळ्या वाटपा बरोबरच त्यांची तपासणी देखील केली. कोरोनावर मात करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांना त्यांनी होमिओपॅथीच्या गोळ्या मोफत देऊन त्यांना त्यांचा उपयोग कसा करावा याची देखील माहिती दिली .

रोकडेश्वर मंदिरासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी डाॅ.जगताप यांनी नागरिकांना कोरोना या आजाराला कोणीही घाबरून जाऊ नये असे देखील त्यांनी सांगितले. कोणतेेही लक्षणे दिसल्यास लगेच डॉ ना कळवावे असे त्यांनी बोलताना ग्रामस्थांना सुचना दिल्या. कोरोना हा रोग बरा होऊ शकतो हे देखील समजून सांगीतले.

या वेळी नांदगावचे सरपंच अशोक वाळुज, उपसरपंच दादासाहेब निंबाळकर, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक श्याम भोसले, प्रा.वसंत जगताप, आप्पा साहेब पाटील, या मान्यवरांच्या हस्ते गोळ्याचे मोफत वाटप करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा