गावाचे ऋण फेडण्यासाठी भोसलेवाडी येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

पुरंदर दि.१४ जून २०२०: ज्या गावात जन्म घेतला त्या गावाचे संकटकाळी ऋण लक्षात घेऊन त्यांना संकट काळी मदत केली पाहिजे. या सामाजिक भावनेतून मुंबई येथील उद्योजक संतोष अर्जुन भोसले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी येथे गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले .

संतोष भोसले हे मुंबई येथे उद्योजक आहेत. गावाच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात त्यांचे सतत आर्थिक योगदान असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आपल्या गरजू बांधवाना त्यांच्या माध्यमातून ८५ कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे किट पाठविण्यात आले.

या किटचे वाटप पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडेपाटील, पुरंदर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, आदर्श माता मुक्ताबाई भोसले त्यांच्या हस्ते वाटप केले. यावेळी पोलीस पाटील स्वाती भोसले,ग्रामपंचायत सदस्य तृप्ती गणेश भोसले,उपस्थित होते.

या उपक्रमाचे नियोजन हभप संजय महाराज भोसले, हभप कैलास महाराज भोसले, हभप जालिंदर भोसले, शांताराम भोसले, दत्तात्रय भोसले, सोपान भोसले आदींनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा