गणेशोत्सव साजरे करणाऱ्या कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे, दि.२९एप्रिल २०२०: सार्वजनिक गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक घटक परिश्रम घेत असतात. यापैकी अनेक घटक आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडले आहेत. त्यात मंडप, बँड, साऊंड, लाईट या क्षेत्रातील कामगार कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत.

या कामागारांना आणि गणेशोत्सवात विविध कला सादर करणाऱ्या २५० पेक्षा अधिक कलाकारांना पुनित बालन ग्रुपच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ (अण्णा) यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विनोद सातव, प्रभात बँडचे संचालक श्रीपाद सोलापूरकर, पुणे बँड कलाविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन ववले, न्यू गंधर्व बँडचे संचालक बाळासाहेब आढाव, पुणे मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिपक दाते, उपाध्यक्ष दिनकर वांजळे, सेक्रेटरी भारत गलांडे, संजय शिंदे, संजय कुलकर्णी, साऊंड व लाईट संघटनेचे बबलू रमजानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, कार्याध्यक्ष राजू कांबळे, चिटणीस मेहबूब खान, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी अध्यक्ष, शाहीर हेमंत मावळे आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा