पुणे, १८ ऑक्टोबर २०२०: बुधवार दि.१४ ला झालेल्या मुसळधार पावसाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे जळोची येथे पुनर्वसन केलेल्या पत्राशेड मध्ये पावसाचे पाणी जळोची येथील ओढ्यातून वस्तीत पाणी शिरले, यामुळे वस्तीतील सर्व घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगरसेवक बिरजू मांढरे यांनी जेसीबीद्वारे ओढ्यातील पाण्याला वाट करून दिली. मात्र मुसळधार पावसाने पाण्याची पातळी वाढून पाणी पत्राशेडमध्ये शिरले. मांढरे यांनी प्रत्येकाला सतर्क राहण्याचे सांगुन तेथील रहिवाश्यांना घराबाहेर काढत त्यांना सांस्कृतिक केंद्र येथे स्थलांतरित केले जेएष्ठ नगरसेवक किरण गुजर त्यांची झोपण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
अतिवृष्टीमुळे स्थानिक लोकांच्या घरातील अत्यावश्यक वस्तू वाहून गेल्याने नगरसेवक मांढरे यांनी प्रशासनाद्वारे पंचनामा करून कीटकनाशक फवारणी व संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करून जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटिल जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी अतिवृष्टीचा आढावा घेतला मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण व नगरसेवक अभिजीत जाधव यांचे सहकार्य लाभले.
पूरग्रस्तांना शनिवारी दि. १७ नगरसेवक मांढरे यांनी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत व जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते नुकसान झालेल्या १४० कुटुंबाना पांघरण्यासाठी रग, चादर, महिलांना साड्या, मंडई, धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय तेलंगे, अंकुश मांढरे उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव