आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कदम वाकवस्ती ग्रामपंचायतच्या वतीने धान्य वाटप

कदम वाकवस्ती, दि. ३ जुलै २०२० : येथे आज दि. ३ जुलै २०२० रोजी अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या (ता. १९ मे) शासन आदेशान्वये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी लावण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍या आर्थिक उपाययोजनां अंतर्गत आत्‍मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्‍या निर्देशानुसार आज कदमवाकवस्ती ग्रामपंचायतने रेशनिंग कार्ड नसलेल्या कुटूंबना धान्य वाटप करण्यात आले.

लाभर्थ्यांना केंद्र शासनाच्या मार्फत प्रत्येकी पाच किलो तांदूळ व १ किलो हरभरा मोफत वाटप केला. यावेळी पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस अँड. धर्मेंद्रजी खंडारे यांनी ही आज कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला भेट दिली व नागरिकांना आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती दिली.

तसेच हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील कांचन, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी गायकवाड, ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रवीण देसाई, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड, व ग्रामपंचायत सदस्य दीपक काळभोर, अविनाश बडदे, यांच्या उपस्थितीत गोर-गरीब नागरिकांना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्फत धान्य वाटप करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा