शरद भोजन योजने अंतर्गत कुंजीरवाडीमध्ये नागरिकांना धान्य वाटप

कुंजीरवाडी, दि. १५ मे २०२०: समाज कल्याण विभागाच्या शरद भोजन योजने अंतर्गत ४ था टप्पा या माध्यमातून दिव्यांगांना आशा ताईंनी अंगणवाडी सेविका, नर्सेस, यांना प्रत्येकास शरद भोजन योजनेच्या अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना दोन टप्प्यात गहू प्रतिव्यकी २ किलो व तांदूळ प्रती व्यक्ती ३ किलो याप्रमाणे धान्य वाटप दोन टप्प्यात कऱण्यात आले आहे. यामध्ये ५२ कुटुंबातील १८२ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये गहू ३६४ किलो व तांदूळ ५४६ किलो याप्रमाणे धान्य वितरण कऱण्यात आले.

येथे लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्या नागरिकांना आज कुंजीरवाडीच्या सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली ८० किटचे वाटप करण्यात आले. धान्य खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत अशा गरजू नागरिकांसाठी ग्रामपंचायत कुंजीरवाडी व ग्रामस्थांच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून गोर-गरीब नागरीकांना धान्य गहू, तांदूळ, साबण, तेल, साखर, बिस्कीट, चहा पावडर अशा अनेक जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.

बचत गटांच्या महिलांना मास्क बनवण्याचे प्रशिक्षण दिले व त्यामार्फत १००० मस्कचे वाटप करण्यात आले. गावात चेक पोस्ट उभारण्यात आले व दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूचे किट घरपोच देण्यात आले. स्वयंसेविकांनी घरपोच भाजीपाला दिला आणि संपूर्ण गावात आशा ताईंनी सर्व्हे केला अंगणवाडी सेविका, नर्सेस, महिला बचत गटात काम करणाऱ्या गरीब महिलांना देखील जीवनावश्यक वस्तू व मास्क, सेनिटायझर, या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.

कुंजीरवाडी हे गाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून कर्मचा-यांनी वेळोवेळी पूर्ण सेनिटायझर करून घेतले व दुकानदारांनी प्रशासनाने दिलेल्या वेळेतच दुकाने चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरपंचांनी नागरिकांना सांगितले की, आपल्या आसपास गरजू व गरीब कुटुंब आढळून आल्यास तात्काळ आम्हाला कळवा त्या नागरिकापर्यंत मदत पोहचायला आपणाला शक्य होईल व काही गरज भासल्यास किंवा अडचण भासल्यास कुंजीरवाडी ग्रामपंचायत मध्ये संपर्क करावा असे आवाहन कुंजीरवाडी गावच्या सरपंच सुनिता धुमाळ यांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी कुंजीरवाडी उपसरपंच नाना कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, विकास निगडे, संदीप धुमाळ, संतोष कुंजीर, मिलिंद कुंजीर, बापू घुले, शिवाजी कुंजीर, राहुल धुमाळ, व विस्तार अधिकारी म्हेत्रे साहेब, व कुंजीरवाडी ग्रामविकास अधिकारी थोरात भाऊसाहेब गाव कामगार तलाठी पलांडे भाऊसाहेब उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा