कसबा , विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अन्नधान्य वाटप

पुणे, दि.१९ मे २०२०: कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात अन्नधान्य वाटप .
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता रेड झोन असलेल्या परीसरातील लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने कंटेन्मेंट झोन मधील ७०,००० कुटुंबातील लोकांना १५ दिवस पुरेल एवढे धान्य देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे.

या योजनेचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील लोकांना अन्नधान्य वाटून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या किटमध्ये साखर, गहू, चहा पावडर, दूध पावडर, साबण, डाळ, मसाले, हळद, तेल इ. पदार्थांचा समावेश आहे .

या प्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे , कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयचा अध्यक्ष स्मिता वस्ते, उपायुक्त माधव देशपांडे , क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर, सभागृह नेते व नगरसेवक धीरज घाटे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा