‘ओमा फाउंडेशन’ कडून औंध मध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

पुणे, १३ ऑगस्ट २०२२: ओमा फाउंडेशन सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवत आले आहे. नुकतंच ओमा फाउंडेशन तर्फे पुण्यातील सिग्नल्सवर मोफत हेल्मेट वाटप करण्यात आलं होतं. आता फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचं वाटप करण्यात आलंय. औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना फाउंडेशन तर्फे गणवेशाचं वाटप करण्यात आलं.

ओमा फाउंडेशन कडून शाळेतील ५० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटण्यात आले. यामध्ये पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. फाउंडेशन तर्फे याआधीही या शाळेला आर्थिक मदत करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या हस्ते शाळेतील आवारात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याबरोबरच शाळेत चित्रकला प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी ओमा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, उपाध्यक्ष विजय सपकाळ, खजिनदार संजय शेंडगे, कार्याध्यक्ष कैलास गायकवाड, शाळेचे प्राचार्य दीक्षित, उपप्राचार्य पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. जी. कांबळे सर, गोसावी सर, बोराटे सर, बाप्ते मॅडम, चंदनशिवे मॅडम व सहकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी. जे. बनकर यांनी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा