जळगाव ११ डिसेंबर २०२३ : जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील बडे जठाधारी महादेव मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय प्रवचनकार पंडीत प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू असून जिल्हाभरातून लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या कथेसाठी चोपडा तालुक्यातून देखील दररोज हजारोंच्या संख्येने महीला व पुरूष भाविक भक्त चोपडा बसने आगारातून येजा करत आहेत.
भाविकांसाठी रविवारी शिवसेना परीवार चोपडा तर्फे पाण्याची बाॅटल आणि नाश्त्यासाठी शेव, चिवडा, मुरमुरे आणि फळे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सकाळी ७ वाजेपासून बस आगारात शिवमहापुराण कथेला जाणाऱ्या भाविकांना रांगेत जाऊन एक पाण्याची बाॅटल, पेरू फळासह पॅकिंग केलेला शेव व चिवडा नाश्ता म्हणून देण्यात आला. जवळपास ३००० भाविकांना नाश्ता व पाणी बाॅटलसह फळांचे वाटप झाल्याची माहीती कार्यक्रमाचे आयोजक श्री.राजेंद्र गंगाधर पाटील यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील