टेंभुर्णी (सोलापूर), दि. १५ जून २०२० : सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाभिक समाजाच्या २५० बांधवास मोफत धान्य वाटप कीट देण्यात आले.
सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर नाभिक समाजाचा व्यवसाय बंद असल्याने या समाजाला मदतीची गरज आहे. माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर राबविण्यात आले. याप्रसंगी माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश काका पाटील, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद दादा कुटे, मार्केट कमिटी डायरेक्टर दिलीपराव भोसले, उद्योजक बाळासाहेब कोठारी कारखान्याचे संचालक रमेश येवले पाटील तसेच ज्येष्ठ नेते रामभाऊ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, सोमनाथ साळुंखे, रा काँ. शहराध्यक्ष अमोल डोईफोडे, गोरखबप्पा देशमुख, योगेश साळुंखे, विलास काका देशमुख, सोमनाथ काका कदम, दादा चौधरी तसेच नाभिक समाजाचे अन्य पदाधिकारी व बहुसंख्य लोक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी