पुरंदर दि.२२ मे २०२०: पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या वतीने ५७ गरजू लोकांना धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी लोकांनी देवस्थानच्या कामाचे कौतुक केले व आभार मानले. लाॅकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडालेला आहे. अनेकांपुढे आता रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी अनेक सामाजिक संस्था लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.
जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्यावतीने सुध्दा वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणे सुरू आहे.जेजुरी येथे अन्न छत्राच्या माध्यमातून रोज हजारो लोकांना तयार जेवण देण्यात येत आहे. तर खेड्यातील लोकांना सुध्दा मदत म्हणून धान्य व किराणाचे वाटप करण्यात येत आहे. जवळार्जुन (ता.पुरंदर) मधील ५७ लोकांना आज ( शुक्रवारी) किराणा व धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी देवस्थानचे संदिप निकोडे, आप्पासाहेब राणे, अजिंक्य टेकवडे, शिवाजी राजे, गणेश राणे, सतीश राणे, प्रशांत राणे,पोलिस पाटिल श्रीकांत राणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे