जालना ७ जानेवारी २०२४ : जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पठार देऊळगाव येथे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पूरक आहारचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अंडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. जे विद्यार्थी अंडी खातात त्यांना अंडी आणि फळ खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी आनंदाने अंडी व केळी यांचा आस्वाद घेतला. त्यासोबत खिचडीपणं खाल्ली.
सदरील कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका बेबीताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कामी प्रभारी मुख्याध्यापक ज्येष्ठ पदवीधर शिक्षक डी.के.धारे, पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, शिवाजी डीघे, सुषमा कुलकर्णी, उज्ज्वला लेखनार या शाळेतील शिक्षक-शिक्षिका यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संध्या कृष्णा रोडगे पोषण आहार कार्यकर्ती शशिकला रोडगे आणि मदतनीस कृष्णा रोडगे यांनी परिश्रम घेतले.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी