रमजान ईदच्या निमित्ताने इंदापूरमध्ये दुधाचे वाटप: प्रविण माने

इंदापूर, दि. २५ मे २०२०: वर्षभरापासून समस्त मुस्लिम बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो रमजान ईद हा सण आज साजरा होत आहे. रमजान ईद या सणासाठी मुस्लिम बांधवांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी इंदापूर शहरात सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने, जि. प. सदस्य प्रविण माने यांच्या माध्यमातून दुधाचे वाटप करण्यात आले.

इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक, कसबा, सरस्वती नगर मस्जिद या भागातून सुमारे ७ हजार बांधवांना दुधाचे वाटप करण्यात आले. महिनाभर अगदी कडक उपवास (रोजा) करुन ईदचा चंद्र पाहून या उपवासाचा समारोप केला जातो.

मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. यानिमित्ताने सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने ईदचे औचित्य साधून घरोघरी आवर्जून करण्यात येणाऱ्या शिरखुर्मा बनविण्यासाठी या दुधाचे वाटप करत सणाचा गोडवा वाढविल्याचा अभिप्राय प्रविण माने यांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरी होणारी ईद यावर्षी सर्व बांधव घरोघरीच साजरी करणार असल्याने, प्रत्येकासाठी
सणा निमित्ताने भेट असल्याचे सांगत प्रविण माने यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक सुखदुःखाच्या समयी सदैव इंदापूरकरांसोबत सोनाई परिवार हा उभाच असतो, यावेळीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ईद हा सण साजरा करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा छोटासा सहभाग घेतला असल्याचे प्रविण माने यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक पोपट शिंदे, नगरसेवक बाळासाहेब ढवळे, इम्रानभाई शेख, आयाज शेख, समीर पठाण, बशीरभाई भालदार, आझादभाई पठाण, दत्तू भिसे, खाजाभाई बागवान, फकिरभाई पठाण, शकीलाल पठाण, युनिसचाचा देशमुख, मोहम्मद मौलाना, अलीम काझी, फकीरभाई पठाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा