वितरण राष्ट्रीय पुरस्काराचे

दिल्ली, १ ऑक्टोबर २०२२ : नुकतेच २०२२ च्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. यातील इतर क्षेत्रातल्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे…

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम
• सर्वोत्कृष्ट अभिनेता: सूराराई पोट्ट्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या आणि तान्हाजी चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण.
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रू
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कारः एके अय्यप्पनम कोशियुम
• सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावी
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम
• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आला वैकुंठपुरमुलू, एस थमन
• सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :Justice Delayed but Delivered & Three Sisters
• सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम
• सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक
• सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक
• सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी
• सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला
• सर्वोत्कृष्ट संपादन: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम
• सर्वोत्कृष्ट मेकअप: नाट्यम
• सर्वोत्कृष्ट पटकथा: सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन
• सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: अय्यप्पनम कोशियुम
• चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश
• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- ‘गोष्ट एका पैठणीची’

या पुरस्कारांमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटांची चर्चा जास्त प्रमाणात होती. त्यामुळे आता मराठी आणि हिंदी चित्रपट कथा, दिग्दर्शन, आणि अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारांची बाजी मारण्यात यशस्वी होत आहे. त्यामुळे लवकरच आपण ऑस्करपर्यंत झेप घेऊ, हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा