त्या १८ महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

श्रीरामपूर, दि.१ मे २०२०: आज सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातल्याने लॉकडाऊनच्या काळात गरीब कुटुंबांवर उपास मारीची वेळ आली आहे.हातावर पोट असणाऱ्या मजुरांची परिस्थिति फार कठीण झाली आहे. त्यांना कुटूंबाची उपजीविका कशी भागवावी हा प्रश्न आता उभा राहिला आहे.

लॉकडाऊनच्या काळात काही महिला मजूर, विधवा, परितक्ता, बेघर, गरीब महिलांवर उपासमारीची वेळ आली असून जीवन जगणे अवघड झाले आहे. अशातच श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील काही गरजू महिलांनी स्थनिक महिला बचतगटामार्फत तालुका विधी सेवा समितीच्या सदस्यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचा उलगडा केला.

त्यावर विधी सेवेने महिलांच्या भावना समजून घेत तत्काळ दखल घेऊन श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना याबाबत माहिती दिली. त्याप्रमाणे पवार यांनी याची दखल घेत संबंधीत सेवाभावी संस्थांना परिस्थितीबाबत काळविले व तात्काळ मदत जाहीर केली.

संबंधीत सेवा भावी संस्थांच्या सदस्यांनी व तालुका विधी सेवा समितीच्या सदस्यांनी स्थानिक प्रशासनच्या मदतीने सोशल डिस्टस्टिंगचे पालन करून एकूण १८ गरजू लाभार्थी महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मुबंई उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे कोणीही उपाशी राहणार नाही. याबाबत काळजी घेण्याचे निर्देश विधी प्राधिकरणला दिलेले आहेत. या उद्देशाने अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती तथा जिल्हा सत्र न्यायाधीश सलिम यांच्या सुचनेप्रमाणे कार्यरत असलेली विधी सेवा समितीचे प्रतिनिधी अँड क्रांती बागुल, रवी हळनोर, पंकज म्हस्के यांनी याबाबत प्रशासनकडे पाठपुरावा करून ही मदत गरजू महिलांपर्यत पोहचवली.

यातून प्रत्येक महिलेस तेल, साखर, मसाले साबण बेसन पीठ, शेंगदाणे, मीठ, मास्क इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी विधी सेवा समितीचे सदस्य अँड क्रांती बागुल, रवी हळनोर, पंकज म्हस्के, वसंत काळे, कोकरे, तलाठी डहाळे, महिला बचतगट च्या सरिता वाहुळ, आदी उपस्थित होते.

त्यावेळी गरजू महिलांना ही मदत लाभल्याने त्याचे त्याना अश्रू अनावर झाले व त्यांनी प्रशासन, तालुका विधी सेवा समिती व सेवा भावी संस्था चे आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: दतात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा