दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२१ : राष्ट्रपती भवनात नुकतेच २०२० च्या पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. त्यात खास करुन यावर्षी पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यावरुन सर्वसामान्य थरातील लोकांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी पद्म, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारमण आदि उपस्थित होते. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर काहींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार देण्यात आले. यासर्व पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.
पद्मभूषण पुरस्कारांचे मानकरी
श्री. जोर्ज फर्नांडिस. मरणोत्तर पुरस्कार- राजकारण
श्री. अरुण जेटली- मरणोत्तर पुरस्कार- राजकारण
पंडित छन्नुलाला मिश्रा- कलाक्षेत्र- हिंदुस्थानी संगीत
श्री. सुषमा स्वराज- मरणोत्तर पुरस्कार- राजकारण
श्री. सईद- मुमताज अली- अध्यात्म
डॉ.अनिल प्रकाश जोशी- पर्यावरण
नीलकंठ रामकृष्ण माधव मेनन- लोककार्य
कु, पी.व्ही. सिंधू- खेळ- बॅडमिंटन
पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी
शशीधर आचार्य- लोकनृत्य
डॉ.योगी अरुण- चिकित्सा-मेडिसिन
जयप्रकाश अग्रवाल-व्यापार उद्योग
काझी मासूम अख्तर- साहित्य
एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय- ( सेवानिवृत्त) –चिकित्सा- मेडिसिन
डॉ. मुशोवन बॅनर्जी- चिकित्सा-मेडिसिन
डॉ.हिंमतराम भांबू- समाजसेवा-पर्यावरण
श्री.गफूरभाई बिलाखीया- व्यापार उद्योग
श्री.मदनसिंह चौहान-कला- लोकगायन
डॉ.पुरुषोत्तम दधिच- कला-कथ्थक नृत्य
ओनियम बेमबेम देवी- खेळ- फुटबॉल.
याखेरीज अनेक क्षेत्रातील लोकांना त्यांच्या उत्तम कार्यासाठी पुरस्काराने नावजण्यात आले.
पद्म पुरस्कारांचे मानकरी
यात खास करुन अभिनेत्री कंगन रणौत, ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी यांना अभिनयासाठी पद्म पुरस्काराने नावाजण्यात आले. सोहळ्याचे खास आकर्षण ठरलेल्या फळविक्रेत्या तुलसी गौडा यांनादेखील पद्म पुरस्काराने नावाजण्यात आले. एक फळविक्रेत्या असलेल्या या तुलसी बाईने एक लाख झाडे लावून त्यांना जोपासले आणि त्यांना वाढवले. तिच्या आदिवासी गरीब पोशाखात आणि अनवाणी पायाने सम्स्त उपस्थितांचे लक्ष वेधून गेले. तर अहमदनगरच्या राहिबाई यांनादेखील यावेळी पुरस्काराने गौरवण्यात आले. शेतकरी महिलेला सन्मान म्हणजे जगातल्या शेतक-याचा हा सन्मान म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. तसेच शेतकरी हटकल हजबा याने संत्री विकून येणा-या नफ्याचे पेसे वाचवले आणि त्यातून त्यांच्या गावात मुलांसाठी शाळा काढली. स्वत:चा नफा न पाहता केवळ दुस-यांसाठी जगणा-या या सर्वांना आणि त्यांच्या कला-गुणांना मानाचा मुजरा.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस