इंदापूर, दि.२७ मे २०२० : इंदापूर तालुक्यातील एकूण ८ आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य – उपकेंद्रावर रुग्णांच्या तात्काळ सेवेसाठी प्रत्येकी १ अशा ८ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना बुधवारी माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्यावतीने पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
राज्यातील आरोग्य प्रशासन रात्रीचा दिवस करत कोरोनासारख्या माहामारीच्या विरोधात लढत आहेत. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा भगिनी याचसोबत रुग्णवाहिका चालक देखील अत्यंत जिकरीचे काम पार पाडत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्यच आहे, असे सांगत प्रविण माने यांनी तालुक्यातील रुग्णांची सेवा करणाऱ्या आठही चालक बांधवांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या स्वखर्चाने पीपीई किट खरेदी करून देण्यात आले.
याशिवाय पळसदेव याठिकाणी आरोग्य शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्याहस्ते पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर घेण्यात आले. ज्यात साठ वर्षाच्या पुढील नागरिकांची ब्लड प्रेशर, शुगर, कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी या तपासण्या आल्या, याच कार्यक्रमाप्रसंगी या किटचे वाटप करण्यात आले.
सोबत पळसदेव येथील आरोग्य उपकेंद्रावर आशा भगिनींना फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोनासारख्या खडतर परिस्थितीतही आपली सेवा कर्तव्य बजविणाऱ्या भगिनींना या फेसशिल्डचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावतीने तर जि. प. सदस्य प्रविण माने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, मा. जि. प. सदस्य हनुमंत नाना बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ, डॉ. शहा, मेघराज कुचेकर, अनिल कुचेकर, डॉ मिलिंद यादव, निलेश रंधवे, पंकज काशीद, डॉ. चंदनशिवे आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे