राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराचे रविवारी वितरण,डॉ.बाबुराव गुरव, चंद्रकांत फडतरे यांना जीवन गौरव पुरस्कार

कोल्हापूर,१३ जून २०२३ : राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या व सन्मानाच्या राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराचे वितरण, रविवारी दुपारी १२ वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून यावेळी साहित्यिक व विचारवंत डॉ.बाबुराव गुरव आणि शिवराय फुशांबु ब्रिगेड मुंबईचे संस्थापक-अध्यक्ष चंद्रकांत फडतरे, यांना राजर्षी शाहू प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार तर राजर्षी शाहुंच्या विचारांना आदर्श मानून कार्यरत असणाऱ्या ७० मान्यवरांना, राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड.करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, विद्रोही शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर, धम्म अभ्यासिका विजया कांबळे, धम्मलिपीच्या अभ्यासिका छाया पाटील, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, बालनाट्य अलबत्या गलबत्या फेम सागर सातपुते, छायाचित्रकार राजवीर जाधव, अमर पारखे, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड.करुणा विमल यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला अनिल म्हमाणे, सुरेश केसरकर, डॉ. निकिता खोबरे, नामदेव मोरे, जयश्री नलवडे, अरहंत मिणचेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात अभिजित बिचुकले, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, राजेंद्र कोरे, प्रा. बसवंत पाटील, कुमार ननावरे, मदन पवार, शंकर पुजारी, डॉ. देवेंद्र रासकर, डॉ. साक्षी सुतार, जनार्दन पाखरे, मोहन कांबळे, सुप्रिया किरवेकर, अपूर्वा पाटील, प्रियांका पाटील, डॉ. प्रदीप लांडगे, समीर शेख, दिलीप कांबळे, प्रा.डॉ.सुभाष इंगळे, शोभा डोंगळे, अविराज गवळी, बाळासाहेब बोडके, चंद्रकांत सावंत, सुनिता सुतार, संजय सासणे (कोल्हापूर) अनिरुद्ध कांबळे, विनायक पाटील, डॉ. राज सोष्टे (मुंबई) युवराज सावंत (दोडामार्ग), उत्तम रेडकर, किसन फडते, सूर्यकांत तोरस्कर (गोवा), पँथर शेषराव नेवारे (नागपूर), लक्ष्मण माळी, आनंदी काळे, चाँदभैया शेख (सोलापूर) राजू पवार (छत्रपती संभाजी नगर), धनंजय वाघमारे, चंद्रशेखर तांदळे, अस्मिता पवार, डॉ. हाशिम वलांडकर (सांगली), महादेव गायकर (रायगड), डॉ. शंकर अंदानी, अंजना पारखे (अहमदनगर), श्रृती सैतवडेकर (रत्नागिरी), महेश चव्हाण (यवतमाळ), डॉ. संजय वाघंबर (लातूर), सुरेखा महिरे (नंदुरबार), नितीन यादव, काळुराम लांडगे (पुणे), गोविंद पाचपोर (जालना), निशा चौबे, दिक्षा सोनटक्के, डॉ.चंदनसिंह राजपुत, जया बद्रे, बरखा बोज्जे (अमरावती), उमर फारूख खान (आंध्र प्रदेश), मुकुंदराव बागडे (गोंदिया), दामोदर दीक्षित, अनुपमा दाभाडे, डॉ.शुभांगी कुंभार (सातारा), मिलिंद आळणे (वसमत), संतोष राऊत, सायमन रॉड्रिग्ज (पालघर), सुरेश हिवराळे (परभणी), जयकुमार व्यवहारे (चिपळूण), भाऊसाहेब कांबळे (निपाणी), डॉ. यशवंत पाटील (जळगाव), डॉ. मंगेश सानप (ठाणे), अनंत घोगरे, अच्युत माने (उस्मानाबाद) यांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा