आरटीओ कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त टोल पासचे वितरण

पुणे, १ सप्टेंबर २०२२: कोकणात मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी भक्त जातात. यासाठी भक्तांकडून खासगी आणि प्रवासी वाहनांचा वापर करण्यात येतो. या प्रवासी वाहनांना राज्य सरकारने टोल माफी जाहीर केली आहे.

त्या अनुषंगाने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना टोल माफिचे पास पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात येत आहेत. शनिवार पासून पास देण्यास सुरुवात करण्यात आली असून गणेशोत्सव काळात देखील पासचे वाटप सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनुल आदे यांनी दिली.

गणेश भक्तांनी पाससाठी पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, टोलमाफी कशी घ्यावी याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे, टोलमाफी साठी लागणाऱ्या पासचे वितरण पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातून केले जात आहे. पासच्या मागणीसाठी आवश्यक असलेला अर्ज देखील दिला जात आहे.

टोल माफिसाठी अर्जात काय माहिती भराल?

अर्जदाराचे नाव, वाहन क्रमांक, प्रवास कोठून कुठपर्यंत करणार, त्या ठिकाणांची नावे, वाहन क्रमांक याची माहिती भरायची आहे. अर्ज भरल्यानंतर संबंधित अधिकारी ती तपासून त्यानुसार पास देत आहेत. पाससाठी कागदपत्रे वा आधारकार्ड सुद्धा दाखवावे लागत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा