रयत क्रांती संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारणी निवड जाहीर

माना, ७ सप्टेंबर २०२० : माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. टेंभुर्णी येथे या निवडी करण्यात आल्या. पदाधिकार्‍यांची निवड रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले व जिल्हा समन्वयक प्रा सुहास पाटील, रयत क्रांती विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड कृष्णा सूर्यवंशी,छगन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी पार पडल्या.

रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी गणेश मंगवडे (कंदर) व जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा जाधव(तांदुळवाडी) यांची निवड झाली. युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार व्यवहारे (करकंब) यांची निवड करण्यात आली. रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी खालील प्रमाणे करण्यात आल्या.

दत्तात्रय गायकवाड (रिधोरे) तालुकाध्यक्ष माढा, राहुल बाबर (उपळाई) युवा आघाडी तालुका अध्यक्ष माढा, शिवशंकर जगदाळे (रायगांव) तालुकाध्यक्ष करमाळा, बळीराम गायकवाड (रिधोरे) जिल्हा संघटक, कुंदन वजाळे (होळे) जिल्हा उपाध्यक्ष, विठ्ठल भालेराव (अरण) तालुका अध्यक्ष रयत क्रांती क्रीडा संघटना माढा, भीमराव कचरे (पिंपळखुटे) जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया,अमर पवार(टेंभूर्णी) तालुकाध्यक्ष सोशल मिडीया माढा, विराग मांडवकर तालुका संघटक बार्शी, धर्मेश कोठारी (शहराध्यक्ष) टेंभुर्णी, गणेश पवार (सुर्ली) जिल्हा सरचिटणीस, आप्पा थिटे (उंबरे) वे तालुका संघटक माळशिरस, जगदीश मस्के (शेवरे) तालुका सरचिटणीस माढा, अशोक भानवसे (सुर्ली) तालुका संघटक माढा, प्रशांत करळे (रिधोरे) तालुका संघटक माढा, अमोल गवळी (तांदुळवाडी) तालुका उपाध्यक्ष माढा, विशाल इंदलकर (चव्हाणवाडी)युवा आघाडी तालुका संघटक माढा, शंकर जाधव (मोडनिंब) तालुका संघटक क्रीडा संघटना माढा, संतोष माने (कंदर) तालुका उपाध्यक्ष करमाळा,मारूती ठोंबरे(करकंब) तालुका कार्याध्यक्ष पंढरपूर, सागर खंकाळ (आलेगाव) टेंभुर्णी जिल्हा परिषद गटप्रमुख. आदी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

यावेळी राज्यकार्याध्यक्ष दिपक भोसले म्हणाले,रयत क्रांती संघटनेतील कार्यकर्त्यांचे जिल्ह्यामध्ये शेतकरी,शेतमजुर व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान आहे.आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाली महाराष्ट्रात यशस्वी वाटचाल चालु आहे.या निवडी प्रसंगी जिल्हा समन्वयक प्रा सुहास पाटील,म्हणाले,इथून पुढील काळात संघटनेमध्ये बरेच कार्यकर्ते काम करण्यास ईच्छुक आहेत.भविष्यकाळात सर्व संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात येतील.यावेळी संघटनेचे प्रदेश सदस्य छगन पवार,विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड कृष्णा सुर्यवंशी यांनी मगोगत व्यक्त केले.व संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा