बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

ठाणे दि. ३१ जुलै २०२०: कोविड -१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

कोविड -१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत
राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्याला अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद, दर्गाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी केलं .

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. तसेच नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहणार असून बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये असंही ते म्हणाले.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी अाखून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा