सातारा जिल्हा कारागृहात किऑस्क सिस्टीमचे जिल्हा न्यायाधीश कमला बोरा यांच्या हस्ते उद्घाटन; कारागृहातील बंदीना एका क्लिकवर मिळणार आपल्या गुन्ह्याची माहिती

14

सातारा, २७ फेब्रुवारी २०२४ : सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांची गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी ‘किऑस्क सिस्टीम’ सातारा कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-१, श्रीमती कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. या किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले?, त्यांना अटक केव्हा झाली?, कारागृहात दाखल केव्हा झाले?, त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे?, कोणत्या पोलीस स्टेशनचे किती गुन्हे त्यांच्यावर आहेत?, त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खाजगी रक्कम किती आहे?, किती खर्च झाला?, न्यायालयाची मागील कोर्ट पेशीची तारीख काय होती? तसेच न्यायालयाची पुढील कोर्ट पेशीची तारीख काय असेल? याबाबतची सर्व माहिती या किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना मिळणार आहे. यावेळी कारागृह अधीक्षक शामकांत शेंडगे यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले