जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय मानवी तस्करी दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न…

जालना, १२ जानेवारी २०२४ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने परतुर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात राष्ट्रीय मानवी तस्करी दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश वर्षा मोहिते यांनी पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ या कायद्याबद्दल माहिती दिली.

कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरिता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ तयार करण्यात आला आहे. हा कायदा तयार करतांना प्रथम बालक या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला असे त्यांनी सांगितले. बालकांनी त्यांच्यासोबत काही गैरवर्तन घडल्यास त्याविषयी आपल्या जवळच्या व्यक्तीकडे त्वरीत सांगावे तसेच अशा व्यक्तीने तात्काळ त्याबाबतची माहिती पोलीसांना द्यावी, वर्षा मोहिते यांनी सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत मोफत विधी सल्ला आणि मोफत वकील दिले जातात ही माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांना व त्यांच्या इतर नातेवाईकांना द्यावी असे त्यांनी आवाहन केले तसेच स्त्री-भ्रूण हत्या कायदायाविषयी त्यांनी उपस्थित विद्यार्थीनींना सांगितले तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ याचे महत्व सांगितले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, मुख्याध्यापक संजय जाधव यांच्या सह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा