विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली ५१ हजारांची मदत..!

पुणे, दि ३१ जुलै २०२० : आज कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, सामाजिक संस्थांकडून शासनाला सहकार्य मिळत आहे. याचीच जाणीव ठेवत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित झालेल्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीवेळी हा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.

यावेळी पालकमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे – पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा धनादेश देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा