गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाली दिव्या खोसला कुमार

शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाली दिव्या खोसला कुमार

मुंबई, १६ मार्च २०२३: दिव्या खोसला कुमार बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक अल्बममध्ये तिने काम केले आहे. त्याचबरोबर काही सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. दिव्या खोसला कुमार तिच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करीत असताना लोखंडी ग्रीलला धडकली आणि गंभीरपणे जखमी झाली.

अलीकडेच तिच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणादरम्यान तिला ही दुखापत झाली. लोखंडी जाळीवर आदळल्याने तिचे गालाला गंभीर जखम झाली. तिने इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर करीत याबाबत माहिती दिली: “मी माझ्या आगामी प्रोजेक्टच्या ॲक्शन सिक्वेवेन्सदरम्यान खूप जखमी झाले; पण ‘द शो मस्ट गो ऑन’. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांची आणि शुभेच्छांची मला गरज आहे.”
पोस्टवर प्रतिक्रिया देताना, अनेक चाहत्यांनी कमेंट करीत तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दिव्याने तिच्या चित्रपटाचे नाव सांगितले नसले तरी ती ‘यारियां २’मध्ये दिसणार आहे, जो हिमांशू कोहली आणि रकूल प्रीत सिंग यांच्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. ज्याचे दिग्दर्शन खोसला कुमार यांनी केले होते. आगामी चित्रपटात दिव्यासोबत मीझान जाफरी आणि यश दास गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वारीना हुसैन, प्रिया वारियर आणि पर्ल व्ही पुरी हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : केतकी कालेकर

error: Content is protected !!
Exit mobile version