पुणे, ७ नोव्हेंबर २०२० : यंदा कोथरुडकरांची दिवाळी यंदा गोड होणार असून अतिशय नाममात्र दरात दिवाळीचा फराळ आमच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे.याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनावर नियंत्रणासाठी देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील व कार्यकर्त्यांनी मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. यामध्ये अतिशय नाममात्र शुल्क आकारुन पोळी-भाजीची व्यवस्था करणे, वयोवृद्धांना २५% सलवतीच्या दरात औषधे देणे. त्याबरोबरच हँड सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले होते.
त्यामुळे आता कोथरुडकरांची दिवाळी गोड करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील भाजपा मतदार संघाने पुढाकार घेतला असून, १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारुन दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे.
कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात याची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर ते मंगळवार दि. १० नोव्हेंबर दरम्यान दुपारी ३ ते ६ या वेळेत फराळ विक्री होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे