राज्यातील सर्व आमदारांना प्रत्येकी ८० लाखांची दिवाळी भेट, महाराष्ट्र सरकारची घोषणा

नाशिक, २५ ऑक्टोबर २०२२: राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ८० लाख रुपये देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्यातील २८७ विधानसभा सदस्य आणि ६३ विधान परीषद सदस्यांना आपापल्या मतदारसंघांत विकासकामे करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय ठरणार आहे.

तर नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा सदस्य आणि २ विधान परीषद सदस्य आहेत. त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त निधी म्हणजे १३ कोटी ६० लाख रुपये विकासकामांसाठी मिळणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे‌.

त्यातच काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्रालयाने मूलभुत सुविधांसाठी मंजुर केलेल्या व कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांच्या निधीचे वितरण यापूर्वी सरकारने केले आहे. दिवाळीच्या काळातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा निधी देण्यात आला आहे.

शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्याच्या तिजोरीवर १,४६४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या निधीचा बोजा एकाच वेळी पडू नये. यासाठी दर महिन्याला १०टक्के निधी वितरण करण्याचे सरकारने ठरवले आहे

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा