दिवाळी संकल्प अभियान..

मुंबई, २० ऑक्टोबर २०२२ : दोन वर्षानंतर आता कोरोनामुक्त दिवाळी होणार आहे. यंदा शिंदे सरकारचे राज्य आहे. मुख्यमंत्र्यांनी यंदा मंत्रालयातून दिवाळी प्रदुषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान जारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांबरोबर प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी घेतलेल्या शपथ मसुद्यात त्यांनी सांगितले की, दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपण परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. पर्यावरणाची काळजी घेऊन त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या प्लास्टिक वापरातून प्रदुषण होते. त्याचा वापर करणे टाळू. समृद्ध पर्यावरणाच्या वृद्धीसाठी आम्ही वाढदिवसाला एक झाड लावू. त्याची नित्य नियमाने काळजी घेऊ. त्याचे संगोपन करु. दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांची दिवाळी. त्यामुळे या दिवाळीपासून आम्ही शपथ घेतो की, वर्षभरातील सर्व सण हे प्रदुषण मुक्त करण्याचा प्रयत्न करु.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करत असते. यंदा हा शपथविधी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग मुलांबरोबर साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. तसेच निर्सगाशी समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा