पुरंदर मिल्कच्या सभासद दूध उत्पादकांची दिवाळी गोड

पुरंदर, १३ नोव्हेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या पुरंदर मिल्क या संस्थेच्या सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांना आज पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते एक किलो तूप व प्रतिलिटर ३५ पैसे याप्रमाणे बोनसचे वाटप करण्यात आले

कोरोनामुळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. काही निवडक सभासदांना यावेळी तूप व बोनसचे वाटप करण्यात आले.

यावेळी संचालक प्रदीप पोमन, त्रिंबक माळवदकर, आबा ताकवले, अनिवाश कामथे,सुमित बागवांण, संजयनाना जगताप,मोहन जगताप, शंकर कड, बाळासाहेब बहिरट, विठ्ठल मोकाशी, पांडुरंग कामथे, विलास जगताप, राजू मांढरे, सभासद व दूध उत्पादक उपस्थित होते.

यावेळी संचालक प्रदीप पोमन यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, पुरंदर मिल्कच्या माध्यमातून यापुढे दूध उत्पादनात वाढ करण्याचा संकल्प‌करण्यात आला आहे. त्यासाठी यावर्षीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर तीन रुपये बोनस देण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे सभासदांची पुढील वर्षीची दिवाळी सुद्धा गोड होणार हे निश्चीत झाले आहे. संस्थेच्यावतीने सुरू असलेले कोल्ड स्टरेजचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्याच्याही सक्षमते मध्ये वाढ करण्यात येणार आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जगताप यांनी केले तर आभार शासिकांत दाते यांनी मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा