कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अस्थिर करण्याचा कट, डीके शिवकुमारांच्या दाव्याने खळबळ

बंगळूर, २५ जुलै २०२३: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपातून काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. परदेशात राहून काही लोक नव्याने सत्तेत आलेल्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारविरोधात कट रचत आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याची योजना आखण्यासाठी सिंगापूरला गेलेल्या लोकांची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शिवकुमार यांनी मात्र कोणत्याही व्यक्तींची नावे उघड केलेली नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १३५ जागा मिळवून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. आता भाजप आणि जेडीएस नेते समझोत्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिवकुमार यांनी केलाय.

बंगळूर अथवा नवी दिल्लीत बैठक होऊ शकली नाही आणि आता त्यांनी सिंगापूरची तिकिटे बुक केली आहेत. आमचे शत्रू आता एकत्र येऊन मित्र झाले आहेत. माझ्याकडे अशा लोकांची माहिती आहे जे सिंगापूरला फक्त कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्लॅन रचण्यासाठी गेले आहेत, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा