नवी दिल्ली, ३० जून, २०२३ : दिल्ली मेट्रोमध्ये प्रति व्यक्ती दोन सीलबंद दारूच्या बाटल्या वाहून नेण्यास आता DMRC समितीने परवानगी दिलीय. हा निर्णय CISF आणि DMRC च्या अधिकार्यांचा समावेश असलेल्या समितीने पूर्वीच्या आदेशात बदल करून केला आहे. यापूर्वीच्या नियमानुसार दिल्ली मेट्रोमध्ये, विमानतळ एक्स्प्रेस लाईन वगळता मद्य घेऊन नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.
DMRC आधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, मेट्रोच्या परिसरात दारू पिण्यास सक्त मनाई आहे. मेट्रो प्रवाशांनी प्रवास करताना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दारूच्या नशेत प्रवासी प्रवास करत असल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तसेच DMRC ने या सोबतच काही नियम देखील अपडेट केले आहेत. मेट्रो च्या अंतर्गत प्रतिबंधित नियम आणि विनियमांसह मेट्रोच्या वेबसाइटवर आता सुधारित नियम अपडेट केले आहेत. दिल्ली मेट्रो मध्ये प्रवास करताना लाइटर किंवा माचिस बॉक्स घेऊन जाण्यासाठी प्रतीबंध लावण्यात आले आहे.
मेट्रोसोबतच आत्ता एअर इंडियानेही मद्य बाबतची सूचना जाहीर केली आहे. प्रवाशांना मद्य पिण्यास परवानगी देऊ नये जो पर्यंत केबिन कर्मचारी मद्य सर्व्ह करत नाहीत. तसेच कोणता प्रवासी स्वतः आणलेलं मद्य पित आहे या वर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची नोंद घ्यावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे