ऑस्ट्रेलियात अडीच कोटी लोकसंख्येचे केले डीएनए स्क्रीनिंग, भविष्यातील गंभीर आजार कळणार

5

ऑस्ट्रेलिया, मेलबर्न १० सप्टेंबर २०२२: ऑस्ट्रेलियात लोकांना निरोगी ठेवणे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार करण्याच्या हेतूने हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या पूर्ण लोकसंख्येचे डीएनए स्क्रीनिंग सरकारी खर्चाने करणार आहे. असे करणारा तो जगातील पहिलाच देश आहे.

तेथील सरकार सांगते की, लोकसंख्येच्या डीएनए सॅम्पलिंगमुळे येत्या काळात लोकांना कर्करोग, मधुमेह यासारखे आजार जडण्याची किती शक्यता आहे? याबाबत माहिती मिळू शकेल. ऑस्ट्रेलियात त्याची सुरुवात मेलबर्नच्या मोनाश विद्यापीठातून करण्यात आली. फ्री डीएनए टेस्टिंग प्रोजेक्टबाबत लोकांमध्ये अपार उत्साह पाहायला मिळत आहे. २४ तासांपेक्षा कमी वेळात पहिल्या टप्प्यात १८-४० वयोगटातील १० हजार लोकांनी डीएनए स्क्रीनिंगसाठी नोंदणी केली आहे. चाचणीनंतर लक्षात आले की, दर ७५ पैकी एकाला भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका आहे. चाचणीत गंभीर आजाराचे संकेत मिळत असल्याने अनेक लोक चिंतेत आहेत, मात्र त्यामुळे आजारावर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. सरकारकडून देखभालीसाठी उपाय करण्यात येतील. वेळेवर उपचार हा या प्रोजेक्टचा हेतू आहे.

डीएनए स्क्रीनिंगच्या डेटानुसार सरकार आरोग्य बजेट निश्चित करणार आहे. डीएनए स्क्रीनिंगच्या डेटानुसार प्रत्येकाच्या वयोमानानुसार माहिती संकलित केली जाणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा