गोल पोस्ट इतर राजकारण “ती धमकी नाही म्हणणं हे बावनकुळे तुम्हाला पटतं का ?” अजित पवार

“ती धमकी नाही म्हणणं हे बावनकुळे तुम्हाला पटतं का ?” अजित पवार

मुंबई, १० जून २०२३: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकीसंदर्भात भाजपने आपली चूक मान्य करावी. सौरभ पिंपळकरने धमकी दिलेली नाही, असं बावनकुळे यांनी म्हणणं याला काही अर्थ नाही. तुम्हाला तुमचा दाभोळकर करु म्हटलं तर ती धमकी नाही म्हणणं तुमच्या सद्सदविवेकबुद्धीला पटत का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आज राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन आहे, या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे सारख्या व्यक्तींकडून हे बोलणं मान्य नाही.” त्यांनी मान्य केलं पाहिजे की, आमच्या माणसांकडून चुकलं, हे अस होता कामा नये. यांच्यात महाराष्ट्राची संस्कृती सांभाळली पाहिजे. मतमतांतर असू शकतात पण आज यांचे कार्यकर्ते बोलले तर दुसऱ्या पक्षाचेही कार्यकर्ते बोलतील.

त्यामुळे विकासाचे महत्त्वाचे प्रश्न आणि समस्या बाजूला राहतील आणि नको त्या विषयाला वळण लागेल. बावनकुळेंना माझा फोन झाला तर मी स्वतः त्यांच्याशी बोलणार आहे. तुम्ही काय बोलता, तुम्हाला तुमचा दाभोळकर करु म्हटलं तर ती धमकी नाही म्हणणं तुमच्या सद्सदविवेकबुद्धीला पटत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version